‘अन्यथा मध्यप्रदेश प्रमाणे आंदोलन होईल ‘
मुंबई : कर्जमाफी आणि एकूण सर्व मागण्यांवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा. अन्यथा जे मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये झाले, तेच महाराष्ट्रात होईल, असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या उच्चाधिकार समितीसोबत चर्चा करायला आम्ही तयार आहोत. असेही शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीने सांगितले.
सरकारबरोबर चर्चा करायची की नाही, या मुद्दयावर सुकाणू समितीत मतभेद होते. त्यापार्श्वभूमीवर आज सुकाणू समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारशी चर्चा करण्याचा निर्णय़ घेण्यात आला. त्याची माहिती पत्रकार परिषदेत देताना हा इशारा देण्यात आला. खासदार राजू शेट्टी, रघूनाथदादा पाटील आणि जयंत पाटील यांनी ही पत्रकार परिषद घेतली.