तालुक्यासाठी नवा आदर्श : भेडसगावातील दारू कायमची बंद – श्री.हंबीरराव पाटील,जि.प.सदस्य
भेडसगाव : गाव सुखाने नांदले पाहिजे , गावातील तरुणाई व्यसनमुक्त झाली पाहिजे , समाज गुण्यागोविंदाने नांदला पाहिजे , प्रत्येकाचे संसार टिकले पाहिजेत, यासाठी सामाजिक बांधिलकी जपत आजपासून भेडसगावातील सरकारमान्य देशी दारूची दुकाने, बीअर शॉपी बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेच्या ठरावात संमत होत आहे,त्याचबरोबर दुकानदारांनी ही याबाबत उत्स्फूर्त सहभाग दर्शवला,असे जि.प. सदस्य हंबीरराव पाटील म्हणाले.
श्री. पाटील ग्रामदैवत निलकंठेश्वर मंदिराच्या सभागृहात बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलिस उपाधीक्षक विजय लगारे होते.
पाटील पुढे म्हणाले कि , गावा गावात दारूमुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे कलह निर्माण होत आहेत. दारूबंदीची लोक चळवळ हि व्यसनमुक्त समाज चळवळ व्हावी .यासाटी ग्रामपंचायत व प्रशासन यांच्यावतीने जे काही सहकार्य लागेल, त्यासाठी मी स्वतःपुढाकार घेईन . व्यसनमुक्त झाल्या नंतर आरोग्य शिबीर ,उद्बोधन पर व्याख्याने ,संवाद यांचेही आयोजन केले जाईल .मतदानाच्या प्रक्रियेपर्यंत न जाता आजपासून गावातील सर्व मद्यविक्री करणारी दुकाने बंद केली जातील, शिवाय खाजगी विक्री करणाऱ्यांचाही गावकऱ्यांच्यासहकार्याने बंदोबस्त केला जाईल, असेही ते म्हणाले.
भेडसगाव दारूबंदी चळवळीचे मुख्य प्रवर्तक पोलीसउपाधीक्षक विजय लगारे म्हणाले कि, गावाला खूप मोठ्या समृद्ध इतिहासाची परंपरा लाभली आहे. गेल्या कित्येक पिढ्या व्यसनापायी बरबाद झाल्या आहेत. २५ ते ३० वयोगटातील तरुणांची यात लक्षणीय संख्या आहे. यासाठी गावातील सर्व मद्यविक्री बंद करण्याचा दुकानदारांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा व दुकाने बंद करावीत, लगारे साहेबांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत बैठकीस सर्व दुकानदारांनी दारूची दुकाने आजपासून बंद करत असल्याचेही जाहीर केले.
दारूबंदी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते भोला कारंडे यांनी पोलीस उपाधीक्षक विजय लगारे, हंबीरराव पाटील, दुकानदार , ग्रामस्थ, महिला यांचे विशेष अभिनंदन करण्याचा ठराव मांडला. उपस्थितांनी याला टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. यावेळी डॉक्टर सुभाष पाटील,मानसिंग लगारे, अमर पाटील, बाबासाहेब पाटील,आप्पासो साळुंखे, आनंद फाळके, मारुती फाळके, सिंधुताई फाळके, संगीता पवार, ईश्वरा पाटील,यांनी मनोगते व्यक्त केली.
बैठकीस सरपंच रेश्मा फाळके, उपसरपंच सर्जेराव पाटील, ग्रा.प.सदस्य बाबुराव पाटील, मानसिंग घाटगे, जयराज पाटील, लक्ष्मण कारंडे, भानुदास लगारे, रेश्मा लगारे, संदीप गुरव, राजू नारकर, प्रकाश चौगुले, संभाजी कारंडे, शरद पाटील, तुषार लगारे, आबासो लगारे , सुनील पाटील, नामदेव कणसे, रोहन लगारे ,डॉक्टर.संदीप पाटील ,गणपती पाटील, सुरेश चौगले, रंगराव गायकवाड, नरेंद्र गायकवाड, गावातील तरुण वर्ग जेष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आनंद फाळके यांनी आभार मानले.