गुन्हे विश्व

कोल्हापुरात मुलानेच चिरला वृद्ध आईचा गळा : भरदिवसा घडली घटना

कोल्हापूर : येथील आर.के. नगर मध्ये एका तरुणाने संपत्तीच्या वादातून राग आल्याने आपल्या आईचाच गळा चीरल्याची घटना घडली आहे. तरुणास करवीर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार , पृथ्वीराज अमरसिंह माने (वय ४७ वर्षे )याने उद्योग व्यवसायासाठी वडिलांकडे सातत्याने पैशाची मागणी केली होती. दरम्यान पृथ्वीराज साठी वडिलांनी अनेकवेळा व्यवसायासाठी पैसे दिले होते,परंतु कोणताही व्यवसाय न चालल्यामुळे वडील पुन्हा पुन्हा पैसे द्यायला तयार नव्हते.
आजदेखील सकाळी असाच पैशावरून वाद झाला होता. तो संपत्तीची वाटणी करून मागत होता. वडील अमरसिंह माने (वय ८० वर्षे )यांनी, या गोष्टीस नकार दिला. याचाच पृथ्वीराज ला राग आला. वाद झाल्यानंतर तो आपल्या दुसऱ्या मजल्यावर रहात असलेल्या खोलीत गेला. या वेळी वडील अमरसिंह माने हे आंघोळीला निघून गेले.परंतु रागाच्या भरात पृथ्वीराज घरातून सुरा घेवून खाली आला. पण त्याठिकाणी वडील नव्हते. त्याची आई सौ.ज्योती अमरसिंह माने (वय ७५ वर्षे ) या तिथे होत्या. आईसुद्धा कधी आपल्या बाजूने बोलत नव्हती,ती नेहमी वडिलांचीच बाजू घ्यायची, या रागापोटी पृथ्विराजने खाली येवून आईचे तोंड एका हाताने दाबले व दुसऱ्या हाताने तिच्या गळ्यावर सुरा फिरवला,तसेच पोट, छाती,कमरेवर देखील वार केले. या दरम्यान त्याचा आईच्या तोंडावरचा हात निघाला,आणि तिच्या किंचाळण्याचा आवाज अमरसिंह माने यांनी ऐकला, व ते बाहेर आले. त्यांना आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. त्यांनी तत्काळ त्यांना सीपीआर मध्ये नेले. व त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल केले.सध्या ज्योती माने यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान काही वेळातच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली.व काही वेळातच पृथ्वीराजला पकडले. पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करीत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!