शिराळा तालुक्यात ऑक्टोबर मध्ये ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका
शिराळा : शिराळा तालुक्यातील ऑक्टोबर महिन्यात मुदत संपत असलेल्या ६० ग्रामपंचायतींसाठी प्रभाग व आरक्षण कार्यक्रम १४ जून ते ३ ऑगस्ट पर्यंत जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक लागणाऱ्या ग्रामपंचायती अशा : आरळा, वाकाईवाडी, चरण, मोहरे, काळुंद्रे, मणदूर, खुंदलापूर, गुढे, सोनवडे, किनरेवडी, कोकरूड, माळेवाडी, मांगरूळ, शिंदेवाडी, येळापूर, नाठवडे, शेडगेवाडी, गवळेवाडी, हत्तेगाव, खिरवडे, चिंचोली, कापरी , रेड, खेड, मांगले, देववाडी, लादेवाडी, सागाव, पावलेवाडी, शिराळे खुर्द, फुफिरे, पुनवत, कणदूर, ढोलेवाडी, नाटोली, कांदे, वाडीभागाई, चिखली, बिउर, उपवळे, तडवळे, धामवडे, कोंडाईवाडी, गिरजवडे, शिवरवाडी, अंत्री खुर्द, अंत्री बुद्रुक, वाकुर्डे खुर्द, पाचुंब्री, भटवाडी, पाडळेवाडी, पाडळी, औंढी, निगडी, करमाळे, टाकवे, भैरववाडी,प.त.शिराळा, घाग्रेवादी, बेलदारवाडी.