शाहुवाडी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी
बांबवडे : आज दि. १२जुन रोजी शाहुवाडी तालुक्यात मान्सून ने दमदार हजेरी लावली असून, दुपारी ४ वाजण्याच्या नंतर सगळीकडेच पाऊस जोरदार बरसू लागला आहे. परंतु अद्याप तालुक्याच्या उत्तर भागात मात्र पावसाचा जोर दिसत नसून, केवळ हजेरी लावली आहे.
मलकापूर, बांबवडे परिसरात मात्र पावसाने पाणीच पाणी केले आहे. गेले काही दिवस भुरभूर पडणारा पाऊस आज मात्र दमदारपणे बरसू लागला आहे. गेले चार दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतेत होता, पण आजच्या पावसाने मात्र शेतकरी पुन्हा एकदा सुखावला. काल मंत्रिगटाच्या उच्चाधिकार समितीने शेतकऱ्यांना सरसकट दिलेली कर्जमाफी हा शेतकऱ्याच्या आनंदाचा पहिला क्षण होता, आणि आज उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या बाजूने कौल देत, जोरदार हजेरी लावली आहे.