राज्याचा निकाल ८८.७४ % : कोल्हापूर चा निकाल ९३.५९%

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी च्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला असून राज्याचा निकाल ८८.७४ % लागला आहे. या परीक्षेत पुन्हा एकदा कोकणातील मुलींनी बाजी मारली आहे.
यावर्षी दहावीच्या परीक्षेला १६,४४,०१६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४,५८,८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. २४ जूनला दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या-त्यांच्या शाळांमध्ये गुणपत्रिका मिळणार असून, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार आहे.
विभागवार निकाल पुढीलप्रमाणे :कोकण ९६.१८ %, कोल्हापूर ९३.५९ %, पुणे ९१.९५ %, मुंबई ९०.०९ %, औरंगाबाद ८८.१५ %, नाशिक ८७.७६ %, लातूर ८५.२२ %, अमरावती ८४.३५ %, नागपूर ८३.६७ %.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!