शिराळ्यातील ‘ स्वराली ‘ सद्गुरू आश्रम शाळेतून प्रथम : शाळेचा निकाल ९६.६६%
शिराळा, ता.१४: येथील सद्गुरू प्राथमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी कु स्वराली शिवाजी चौगुले हिने दहावीच्या परीक्षेत ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. शाळेचा निकाल ९६.६६ टक्के लागला आहे.
सीमा राठोड ८९.४० दुसरा, शुभम खुर्द ८८.८० तृतीय, अनिकेत जाधव ८७.८० चतुर्थ, महेश नलवडे याने८५.४० टक्के गुण मिळवले. त्यांना मुख्याध्यापक बी.डी.पाटील, सर्जेराव टाकले, राजेंद्र टिळे ,वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.