दत्तसेवा तुरुकवाडी चा १० वी चा निकाल १०० % : तृप्ती पाटील ९३ % गुण मिळवून पहिली
तुरुकवाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक स्शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१७ मध्ये दहावीच्या घेतलेल्या परीक्षेत दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी ,तालुका शाहुवाडी शाळेचा निकाल १०० % लागला आहे. विद्यालयातून कु.तृप्ती तानाजी पाटील ९३ % गुण मिळवून प्रथम आली. तर कु.साक्षी संजय पेटकर हिने ९०.४० % गुण मिळवून द्वितीय तर कु.प्रियांका सुनील बनसोडे ,तसेच कृष्णकांत काशिनाथ सोनावणे ८८.८० % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात याच उद्देशाने या दत्तसेवा विद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या विद्यालयाचा १२ वि चा निकाल देखील १०० % लागला होता. विद्यालयाच्या यशात मुख्याध्यापक शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा मोठा वाट आहे. असे मत संस्थेचे संस्थापक श्री आनंदराव माईंगडे यांनी एस.पी.एस.न्यूज शी बोलताना व्यक्त केले.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पोतदार सर,यांच्यासह अध्यक्ष श्री आनंदराव माईंगडे,उपाध्यक्ष अॅड.सतीश आनंदराव माईंगडे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील विद्यार्थी ग्रामीण भागातील असलेने या मुलांना अतिरिक्त शिकवणी लाभत नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षक हेच त्यांचे मुख्य मार्गदर्शक असतात. आर्थिक परिस्थिती बेताची असलेने विद्यार्थी सुद्धा तितक्याच जिद्दीने अभ्यास करतात. म्हणूनच या विद्यार्थ्यांना मिळालेले यश कौतुकाचे आहे, असेही संस्थापक श्री आनंदराव माईंगडे यांनी सांगितले.