२३ जून अखेर मतदार यादीत नवे नोंद करावीत-तहसीलदार चंद्रशेखर सानप
मलकापूर : ज्या नागरिकांची नावे अद्याप मतदार यादीत नोंदविलेली नाहीत, अशा नागरिकांनी २३ जून पर्यंत आपली नावे मतदार यादीत नोंद करावीत, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तथा शाहुवाडी चे तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडे १ जुलै २०१७ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असल्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने शाहुवाडी तालुक्यातील या निवडणुकीसाठी २३ जून अखेर मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार आहे. यामुळे ज्यांचे मतदार यादीत नाव नाही, अथवा नव्याने नाव नोंदणी करणाऱ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी केले आहे. तसेच आपले नाव मतदार यादीत नोंद आहे का? याची खात्री करावी.ज्यांना मतदार यादीत नाव नोंद करायचे आहे, त्यांनी नमुना क्र. ६ , रहिवासी पुरावा व जन्मतारखेचा पुरावा यांसह आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे २३ जून अखेर सदर करावे, असेही श्री सानप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.