‘मध्यावधी निवडणुकांचा पैसा शेतकऱ्यांना द्या ‘-उद्धव ठाकरे
बुलढाणा : मध्यावधी निवडणुकांवर खर्च होणारा पैसा शेतकऱ्यांना द्या,असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना लगावला.
सध्या उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं शेतकरी विजय मेळाव्यात बोलत होते.
दरम्यान मध्यावधी निवडणुका संदर्भात शिवसेनेच्या वतीनेच राजकीय भूकंपाच्या गोष्टी करून डिवचले होते.
श्री. ठाकरे पुढे म्हणाले कि,’साले’ म्हणणाऱ्यांना आम्ही रडवल्याशिवाय राहणार नाही, हे शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. क्रांतीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली याचा आनंद वाटतो. मी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे आणि यापुढेही देणार आहे, त्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावू देणार नाही. कर्जमाफीच्या निकषांवर शिवसेनेची करडी नजर आहे, असं उद्धव यांनी सांगितले.