शेतकरी आंदोलनाला राष्ट्रीय पातळीवर स्थान देण्यासाठी खासदार शेट्टी दिल्लीला
नवी दिल्ली : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी खासदार राजू शेट्टी दिल्लीला बैठकीसाठी गेले होते.
या बैठकीसाठी महाराष्ट्र, उत्तराखंड, हरियाना, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश, आणि पश्चिम बंगालचे प्रतिनिधी उपस्थित होते.राजस्थानच्या रामपाल जाट, कर्नाटक चे उड्डीआळी चंद्रशेखर,उत्तरप्रदेश चे व्ही.एम. सिंग, दिल्ली चे योगेंद्र यादव, या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रीय पातळींवर शेतकऱ्यांच मोठ आंदोलन उभ राहील तर मोदी सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.