गुन्हे विश्व

…नवरदेवाची वरात थेट पोलीसठाण्यात ?

शिराळा :: नववधूच्या हातावरची मेहंदी वाळण्याअगोदरच, ऐन लग्नात नवरदेवास बलात्काराच्या तक्रारीमुळे शिराळा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने लग्नमंडपात हळ हळ व्यक्त करण्यात येत होती.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,देववाडी तालुका शिराळा येथील दशरथ कृष्णातजी खोत (वय २८ वर्षे )यास ३७ वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणी शिराळा पोलिसांनी अटक केलीय. याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, आज दशरथ खोत याचे लग्न होते. लग्न झाल्यानंतर इतर विधी सुरु असतानांच त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली असल्याची माहिती दशरथ ला मिळाली. कपाळावरील बाशिंग सुटण्या अगोदरच आणि हातातील हळकुंड सोडवण्या अगोदरच नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात काढण्यात आल्याने,या घटनेची चर्चा तालुकाभर झाली आहे.
पिडीत तरुणीने पोलिसात तक्रार दिल्याने हि कारवाई करण्यात आली. समजलेल्या माहितीनुसार पिडीत तरुणीचे वडील व्यसनाधीन होते. त्यामुळे संबंधित तरुणी आणि तिची आई मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्य मुलीच्या घरासमोर दशरथ च्या मित्राचे घर होते. त्यामुळे तो तिथे वारंवार येत होता. त्यामुळे त्याची नजर पिडीत तरुणीवर पडली. नोव्हेंबर २०१६ रोजी तरुणी घरात एकटी असताना माझे तुझ्यावर प्रेम आहे,असे त्याने तिला सांगितले. त्यावेळी तिने प्रेमास नकार देताच त्याने दरवाजा बंद करून तिला मारण्याची धमकी दिली, व दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार तिच्यावर बलात्कार करत राहिला. १६ जून २०१७ रोजी सायंकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नाही ,हे पाहून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती पिडीत तरुणीने आपल्या आईला सांगितली. त्यानंतर मुलीच्या आईने या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर पिडीत तरुणीने शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात निघाली.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक किशोर काळे करत आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!