दुधाच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ -नाम. जानकर
मुंबई : दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांना काही अंशी का होईना, समाधान देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. असे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले कि, या दुध दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार नसून दुध संघांनी हे सोसायचे आहे. असे निर्देशही दुध संघांना देण्यात आल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले.
दूधसंघांनी निर्देशाचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा जानकरांनी दिलाय. महागाई निर्देशांक जसा वाढेल तसे दुधाचे दर वर्षातून एकदा वाढणार आहे.