बांबवडे त पाकिस्तानी ध्वजाची होळी
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी व ग्रामस्थांनी पाकिस्तानी ध्वजाची होळी करीत आपला संताप व्यक्त केला.
गोगवे तालुका शाहुवाडी येथील श्रावण बाळकू माने या २५ वर्षीय तरुणाला हौतात्म्य प्राप्त झाले. हि घटना पाकिस्तान च्या ‘ बॅट ‘ च्या टीम मुळे घडल्यामुळे पाकिस्तान विषयी जनसामान्यांमध्ये कमालीचा संतप निर्माण झाला असून, त्याचे प्रतिक म्हणून शिवसेना तसेच अन्य सर्व ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवासैनिकांसाहित ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.