ऐसे भाग्य न देखियले कधी डोळा, असा जाहला देशभक्तीचा सोहळा !!!

बांबवडे(मोहन घोडके -विशेष प्रतिनिधी ) :शाहुवाडी तालुक्यातील भारतमातेच्या या लेकराला अखेरचा निरोप देण्यासाठी अवघ्या जिल्ह्यातून नागरिक आले होते. गोगवे गावच्या सुपुत्राला लष्करी इतमामात बंदुकीची सलामी देवून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी डोळे भरून पाहिलेला हा देशभक्तीचा सोहळा अंतरंगात मात्र हळ हळ निर्माण करून गेला.
यावेळी शहीद श्रावण यांच्या वडिलांच्या हस्ते अंत्यविधी पार पडला. या अंत्यविधी ला तसेच देशाच्या या जाँबाज जवानाला अभिवादन करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हापोलीस प्रमुख संजय मोहिते, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कर्नल विजयसिंह गायकवाड, आमदार उल्हास पाटील शाहुवाडी तालुक्याचे आमदार सत्यजित पाटील , आमदार चंद्रदीप नरके,आमदार अमल महाडिक, जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी मेजर सुभाष सासने, जिल्हापरिषद बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, उदय साखर चे चेअरमन मानसिंगराव गायकवाड,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर , रणवीर युवा शक्तीचे संस्थापक रणवीर सिंग गायकवाड, जिल्हापरिषद सदस्य हंबीरराव पाटील, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक,तहसीलदार चंद्रशेखर सानप, नायब तहसीलदार विजय जमादार, शाहुवाडी पंचायत समितीच्या सभापती डॉ. स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील, जिल्हापरिषद सदस्य विजय बोरगे, पंचायत समिती सदस्य सौ लतादेवी जालिंदर पाटील, पांडुरंग पाटील ,सौ. सुनिता पारले, नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी सभापती पंडितराव नलवडे, माजी उपसभापती महादेव पाटील साळशीकर, नामदेवराव पाटील सावेकर ,गोगवे गावच्या सरपंच सौ. सुनंदा तुकाराम पाटील उपसरपंच अलका सुतार, शहीद श्रावण यांची बहिण रेश्मा महेश कदम, भाऊ सागर माने,योगीराज गायकवाड, गोकुळ चे संचालक विश्वास जाधव, संचालिका सौ. अनुराधा ताई पाटील, विशाल साठे,अभयसिंह चौगुले, बाळासाहेब चौगुले, सुरेश नारकर,संजय कांबळे पोलीस पाटील बांबवडे, अनेक गावचे सरपंच ,संस्थांचे पदाधिकारी,गोगवे शाळेचे विद्यार्थी,अनेक तरुण मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

7+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!