‘ वळू ‘ ची आजाराने एक्झिट

सांगली:  संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मूकअभिनयाने वेड लावत लोकप्रियतेच्या शिखरावर उधळलेल्या वळूने रविवारी एक्झिट घेतली .ऊमेश कुलकर्णी यांच्या  ‘वळू ‘ चित्रपटात या मूक अभिनेत्याने संपूर्ण महाराष्ट्रात धमाल केली होती. सांगलीतील पांजरपोळमध्ये वास्तव्यास असलेल्या या तीनशे किलो वजनाच्या वाळूचे निधन झाल्यानंतर अनेकजण हळहळले ..

दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या २००८ मधील चित्रपटाचाहा खरा खुरा नायक, प्रत्यक्षात खलनायकाच्या भूमिकेत लोकप्रिय झाला होता. राज्य व राष्ट्रीय विविध संस्थेचे पुरस्कारही त्याने पदरात टाकले. तब्बल तीनशे किलो वजन, लालसर डोळे, दहशत बसावी अशी जाडजूड शिंगे, अशा शरीरयष्टीचा हा ‘ वळू ‘ मुळचा सांगलीतील पांजरपोळचा. चित्रपटासाठी पाहिलेल्या तब्बल ३०० वळुंमधून  दिग्दर्शकांनी या  ‘वळू ‘ ची निवड केली होती. सांगलीचा हा गुणी मूक कलाकार गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याने खाणे पिणे सोडले होते. त्यामुळे तीनशे किलोवरून त्याचे वजन दोनशे किलोपर्यंत घटले होते. त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. वजन जास्त असल्याने तसेच तो वृद्ध झाल्याने उपचारास साथ मिळत नव्हती. अखेर रविवारी सकाळी त्याचे निधन झाले, अशी माहिती येथील डॉक्टर उद्धव धायगुडे यांनी दिली.

1+

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!