शहीद संदीप जाधव यांच्या वारसांना LIC ने दिली विम्याची रक्कम
बांबवडे : देशाचं कर्तव्य पार पाडण्यामध्ये कधीही कसूर न केलेल्या शहीद नाईक संदीप जाधव यांनी आपल्या कुटुंबच कर्तव्य पार पाडण्यात हि कसूर केलेली नाही. आपल्या माघारी आपल्या कुटुंबाची आर्थिक हेळसांड होवू नये ,म्हणून त्यांनी स्वतः चा जीवन विमा उतरवला होता.
त्या विम्याची रक्कम LIC च्या शाखा सिल्लोड ने अवघ्या २४ तासांच्या जाधव यांच्या वारसांना धनादेश स्वरुपात दिली आहे.
यातून भारतमातेच्या कार्त्च्यासोबत कौटुंबिक कर्तव्य सुद्धा यशस्वीरित्या पार पाडले.