चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी : मनसोक्त भिजण्यासाठी तरुणाई मंडपच्या धबधब्याकडे
शिराळा: चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. गेल्या २४ तासात १०७ मिलीमीटर पावसाची नोंद वारणावती येथे झाली आहे. .
शिराळा तालुक्याचे पश्चिम विभागात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे डोंगर दऱ्यातून धबधबे कोसळत आहेत. ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. धरणाची पाणी पातळी. ५९६.९० मिटर झाली आहे. तर पाणी साठा १०.९५ टीएमसी झाला. तर टक्केवारी ३१.८३ आहे. धरणातून ३०० क्युसेक विर्सग वारणा नदीत सुरू आहे. गेल्या २४ तासात १०७ मिलीमीटर सह एकूण ३१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
उखळु( ता.शाहूवाडी) येथील मंडपचा धबधबा चांदोली धरण परिसरात पावसाने सुरुवात केल्याने कोसळू लागला असल्याने त्या ठिकाणी मनसोक्त भिजण्यासाठी तरुणाईची पावले वळू लागली आहेत.