सोंडोली येथे आरोग्य शिबीर उत्साहात
सोंडोली / वार्ताहर
सोंडोली ता. शाहूवाडी येथे जिल्हा परीषद आरोग्य विभाग कोल्हापूर , राजाराम बापू सह.साखर कारखाना , श्री वारणा विद्यालय सोंडोली, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात ४२७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीराचे उद्धघाटन जि.प.बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थित डॉ. प्रकाश म्हाळूंगेकर मेडीकल ऑफिसर राजाराम बापू कारखाना हे होते.
यावेळी रुग्णांची रक्त, लघवी तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. यावेळी जयंत नेत्रालय यांच्या मार्फत मोफत डोळे तपासणी करण्यात आली. यावेळी धनाजी पोवार आरोग्य विभाग शाहुवाडी यांनी हिवताप, चिकनगुन्या , डेंगू व पावसाळ्यातील साथीच्या आजाराविषय मार्गदर्शन केले.
यावेळी सोंडोलीसह खेडे , मालेवाडी , थावडे , जाबूंर येथील रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला.
यावेळी डॉ यू .जी. कुभांर , अति.जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर , डॉ . बी.के. काबंळे तालुका आरोग्य अधिकारी शाहूवाडी ,.डॉ. नरेंद्र माळी भेडसगाव, डॉ .अभिजीत पाटील बालरोग तज्ञ , यांनी रुग्णांची तपासणी केली, व जयंत नेत्रालय इस्लामपूर मार्फत मोफत नेत्र तपासणी केली.
यावेळी शित्तूर वारुण व भेडसगाव प्रथमिक आरोग्य केंद्रचे सर्व कर्मचारी सहभागी होते ,व मुख्याध्यापक सजंय पाटील व सर्व शिक्षक वृंदाचे विशेष सहकार्य लाभले.