सोंडोली इथं प्रथमिक आरोग्य उपकेंद्र मंजुरीसाठी प्रयत्न करणार.—– सर्जेराव पाटील पेरीडकर.

सोंडोली / वार्ताहर
ग्रामिण भागातील जनतेला सुलभ व तत्काळ आरोग्य सेवा मिळावी, यासाठी वारणा व कानसा खो-यातील मध्य ठिकाण असलेल्या सोंडोली येथे लवकरात लवकर आरोग्य उपकेद्रांच्या उभारणीसाठी व मंजूरीसाठी प्रयन्त करणार आसल्याचे, प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परीषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांनी केले. ते सोंडोली ता.शाहूवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्धघाटन कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्ष स्थानी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील होते.
या कार्यक्रमात पुढे बोलतानाश्री पाटील म्हाणाले की, जिल्हा परीषद प्रथमिक शाळांचा दर्जा सुधारला पाहीजे, यासाठी प्रयन्त चालू असून पहिलीच्या वर्गाला सेमी इंग्लीश चालू केले असून, शित्तूर वारुण मतदारसंघांतील सर्वच शाळांना भेटी देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले .
या कार्यक्रमात ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील म्हाणाले की, सध्या पावसाळा सुरु असून ग्रामिण भागात येणारे साथीचे अजार, त्यासाठी मार्गदर्शन मिळावे, व आपल्या गावत योग्य उपचार मिळावा, यासाठी जिल्हा परिषद व राजाराम बापू साखर कारखान्याच्या वतीने हे शिबीराचे आयोजन केले आहे.
सोंडोली सारख्या गावात आरोग्य उपकेंद्र झाल्यास, वारणा व कानसा खो-यातील दहा ते पंधरा गावातील लोकांची सोय होणार आहे, तरी आरोग्य आरोग्य सभापतींनी प्रयत्न करावा, अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी केली आहे.
,या कार्यक्रमासाठी प्रकाश म्हाळूंगेकर मेडीकल ऑफिसर, राजाराम बापू कारखाना डॉ यू .जी. कुभांर , अति. जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर , , डॉ . बी.के. काबंळे तालुका आरोग्य अधिकारी शाहूवाडी, .डॉ. नरेंद्र माळी भेडसगाव, डॉ .अभिजीत पाटील ,.माजी सरपंच प्रकाश पाटील, आण्णासो पाटील, दिलीप पाटील, मुख्यध्यपक संजय पाटील, विश्वास पाटील, आनंदा सावंत, ग्रामसेवक बी.जी.पाटील, व परीसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचलन भगवान सावंत यांनी केले .

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!