‘ बदला तो लेंगे ही !! ‘
बांबवडे : चँपियंस ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारताच्या पुरुष खेळाडूंचा पाकिस्तान बरोबर झालेल्या लढतीत पराभव झाला होता. त्याचा बदला ‘ वूमन्स वर्ल्ड कप ‘ च्या स्पर्धेत महिलांनी पाकिस्तानी महिला टीम चा पराभव करून बदला घेतला, अशीच चर्चा ऐकावयास मिळत आहे.
आज दि.२ जुलै रोजी ‘वूमन्स वर्ल्ड कप ‘ च्या स्पर्धेत भारतीय महिलांची , पाकिस्तानी महिलांशी लढत झाली. या लढतीत भारतीय महिलांनी पाकिस्तानी महिला टीम चा ९६ धावांची आघाडी घेवून पराभव केला. आणि भारताचा शानदार विजय साजरा करण्यात आला.
एकंदरीत भारताचा क्रिकेट मध्ये झालेल्या पराभवाचा महिलांनी पाकिस्तानवर विजय मिळवून शानदार विजय साजरा केला.