वारणा नदीत वाहून गेलेला तरुण सनी चौगले याचा मृतदेह सापडला.
कोडोली प्रतिनिधी:-
कोडोली ता.पन्हाळा येथील सनी अरुण चौगले, हा दिनांक २९ जून रोजी मासेमारी साठी गेला असता,वारणा नदीत वाहून गेला होता. कोडोली पोलीस ‘ जीवन ज्योती ‘संस्थेच्या सहकार्याने त्याचा शोध घेत होते. पण पावसामुळे नदीचे वाढते पाणी आणि नदी पात्रातील मगरीचा वावर, यामूळे शोध कामात अडथळा येत होता. पण आज दि. २ जुलै रोजी सनी चौगुले बुडल्याच्या चौथ्या दिवशी त्याचा मृतदेह सांगली जिल्ह्यातील ऐतवडे पुलाजवळ आढळून आला आहे…