अवकाशात ” तिसरा डोळा ” : रुक्मिणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) : हिंदी महासागरात चीन ने सैनिकी युद्धनौका वाढवल्यामुळे भारत देखील सतर्क झाला आहे. आपला अवकाशातील ‘ तिसरा डोळा ‘ समजल्या जाणाऱ्या ‘रुक्मिणी ‘ उपगृहाच्या सहाय्याने सतत लक्ष ठेवून आहे.
संपर्क आणि देखरेख, ही दोन्ही कामं चोख करण्याची क्षमता असलेला जीसॅट-७ हा उपग्रह २९ सप्टेंबर २०१३ रोजी उपग्रहात सोडण्यात आला होता. २६२५ किलो वजनाच्या या उपग्रहाचं नाव रुक्मिणी असं आहे. हिंदी महासागराच्या विस्तीर्ण क्षेत्रात २००० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात हा अवकाशातील डोळा लक्ष ठेवून असल्यानं नौदलाचं काम सोपं झालंय. सिक्कीम सीमाप्रश्नावर चीन पुन्हा एकदा उठून बसला असून डोक्लाम परिसरात रस्ता बांधकाम करू लागला . अशावेळी भारतीय सैनिकांनी हरकत घेतल्यानंतर सीमेवरील तणाव वाढला असून समुद्रात देखील युद्धनौका चीन ने वाढवल्यामुळे भारत देखील सतर्क झाला आहे.

0

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!