डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या संचालकपदी डॉ. सरदार जाधव तर प्राचार्य पदी सौ. स्नेहल नार्वेकर यांची निवड
पेठ वडगांव: येथील श्रीमती विजयादेवी यादव प्री-प्रायमरी स्कूल, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल व डॉ.सायरस पूनावाला आय.आय.टी. व मेडीकल अकॅडमी पेठ वडगांवचे प्राचार्य डॉ. सरदार बाबासाहेब जाधव यांची संचालक पदी निवड करण्यात आली आहे. तसेच उपप्राचार्य म्हणून कार्यरत असणा-या सौ. स्नेहल नार्वेकर यांची स्कूलच्या प्राचार्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव व सेक्रेटरी सौ. विद्या पोळ या उपस्थित होत्या. यापूर्वी डॉ. सरदार जाधव हे प्राचार्य म्हणून कार्य पाहत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन तसेच इतर कार्याबरोबरच ग्रामीण भागातील शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यापर्यंत योगदान ठरले आहे. प्राचार्य जाधव यांची वर्कशॉप, सेमीनार, कल्चरल इव्हेंट , प्रशिक्षण शिबीर घेऊन अनेक शिक्षकांना सी.सी.ई., बरोबरच विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, अभ्यास पध्दती याबरोबरच शिक्षकांना त्यांच्या अध्ययनासाठी नवनवीन कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी मदत करत आहेत.
यावेळी सौ. विद्याताई पोळ म्हणाल्या की डॉ. सरदार जाधव हे शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगीरी करून आपल्या विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी आदर्श आहेत. त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देवून, अल्प कालावधीत स्कूल नावारूपाला आणलेले आहे. त्यामुळे डॉ. जाधव हे होतकरू, निष्ठावंत, परिश्रमी, अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. असे सांगून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कार प्रसंगी बोलतांना प्राचार्य सरदार जाधव म्हणाले की, मला मिळालेल्या संधीमुळे मला भविष्यकाळातही मी शिक्षण क्षेत्रातून विद्यार्थी व समाजासाठी नव-नवीन उपक्रम राबवून, प्रत्येक विद्यार्थी वैष्विक नागरिक बनविण्याचा प्रामाणीक प्रयत्न करीन. एक प्राचार्य म्हणून मर्यादित न राहता त्यांनी विद्यार्थी शिक्षक व समाज यांना एक सामाजिक जबाबदारी काय असते, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे एक प्राचार्य तसेच एक शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षणतज्ञ आहेत.
तसेच उपप्राचार्य म्हणून कार्यरत असणा-या सौ. स्नेहल नार्वेकर यांची स्कूलच्या प्राचार्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शैक्षणिक विभागामध्ये आमूलाग्र बदल करण्यामध्ये सौ. स्नेहल नार्वेकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी परीक्षा पद्धती , बोर्ड परिक्षा तयारी, वर्कशॉप, सेमीनार, कल्चरल इव्हेंट, प्रशिक्षण शिबीर यांच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले आहे.
या कार्यक्रमास समुपदेशिका माधवी सावंत, भिमा गोणी, मारूती कांबळे, माधवी कोतेकर, प्रफुल अडगुले हया प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ, सचिव सौ. विद्याताई पोळ, अध्यापक वृंद उल्लेखनीय संख्येने उपस्थित होते. हया कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल अडगुले यांनी केले तर आभार माधवी कोतेकर यांनी मानले.