विनयभंग प्रकरणी मांगले तील एकास अटक
शिराळा : शिराळा,ता.८: मांगले (ता.शिराळा)येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी, संशयीत आरोपी आकाराम गणपती पाटील (वय ४९ वर्षे ) यास अटक केली आहे.
ही घटना ३० जून रोजी घडली आहे. या बाबत मुलीने पोलिसात वर्दी दिली आहे.
पोलीसातून मिळालेली माहिती अशी, सदरची अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना, संशयीत आरोपी आकाराम गणपती पाटील याने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन मोटरसायकलवरून शिराळा-करमाळे रोड वरील लॉजवर नेऊन विनयभंग केला.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी.एम.जाधव करीत आहेत.