पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवडी बरोबरच त्यांच्या संगोपनाची गरज- श्री. कुरुंदकर
मलकापूर : पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवडी बरोबरच त्यांच्या संगोपनाची ही जबाबदारी आपण सर्मथपणे पार पाडणे गरजेचं असल्याचे, प्रतिपादन आजरा अर्बन बॅकेंचे मलकापूर शाखा चेअरमन रमेश कुरूंदकर यांनी मलकापूर येथे वृक्ष लागवडी प्रसंगी केले.
आजरा अर्बन बॅकेंचे चेअरमन अनिल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॅकेंच्या वतीनं शासनाच्या चारकोटी वृक्ष लागवड अंतर्गत वृक्ष लागवड अभियान राबविले जात आहे. या अनुषंगाने मलकापूर शाखेच्या वतीने मलकापूर नगरपरिषदेस 100 रोपे देण्यात आली. तर मलकापूर शाखा चेअरमन रमेश कुरूंदकर यांच्यासह मान्य वरांच्या हस्ते शिवाजी स्टेडीयम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना श्री कुरूंदकर म्हणाले कि, आज दिवसेंदिवस पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती करावी लागत आहे. निसर्गाची अनमोल ठेव लोप पावत आहे. मात्र वृक्ष लागवडीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी विशेष अभियान राबविले जात आहे. केवळ वृक्षांची लागवड करून न थांबता त्यांच्या संगोपनाची ही जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडणे गरजेचं आहे.
बॅकेंच्या वतीनं शिवाजी स्टेडीयम परिसरात वृक्षारोपण प्रसंगी मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल केसरकर, बॅकेंचे संचालक डॉ दिपक सातोसकर ,आर डी पाटील, विभागीय अधिकारी सुनिल चव्हाण, बांधकाम सभापती प्रविण प्रभावळकर, अविनाश सोनटक्के, ज्ञानदेव महाडीक, नगरसेवक भारत गांधी, अशोक देशमाने, मानसिंग कांबळे, नगरसेवीका सोनिया शेंडे, मिनाक्षी गवळी, संगीता पाटील, शालन सोनावळे ,माया पाटील, मलकापूर अर्बनचे माजी चेअरमन नंदकुमार कोठावळे, यांच्या सह बॅकेंचे कर्मचारी उपस्थित होते. शाखाधिकारी आर बी पोतदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.