‘ सुराज्य फौंडेशन ‘ च्या वतीने यशवंतांचा सत्कार
कोडोली प्रतिनिधी-:
यावर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून १०० हुन जास्त जण उत्तीर्ण झालेआहेत. त्यापैकी वारणानगरच्या ‘ सुराज्य फौंडेशन ‘ च्या वतीने १९ जणांना गौरविण्यात आले. माजी मंत्री डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते यशवंतांना गौरविण्यात आले. यावेळी काही सत्कार मूर्तींनी त्यांच्या यश प्राप्तीचे प्रवास वर्णन केले.
दरवर्षी,केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातून या परीक्षेमध्ये १०० पेक्षा जास्त जण यशस्वी झाले आहेत. त्यापैकी १९ जणांना आज वारणानगर येथील ‘ सुराज्य फौंडेशन ‘ च्या वतीने वारणा समूहाचे सर्वेसर्वा माजी मंत्री डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यावेळी काही यशवंतांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
माजी मंत्री विनय कोरे तसेच ‘ सुराज्य फौंडेशन ‘ चे अध्यक्ष श्री. एन.एच.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच ‘ सुराज्य फौंडेशन ‘ च्या वतीने चालविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा कोर्सच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी यशवंतांच्या हस्ते करण्यात आला. तसेच माजी मंत्री डॉ.विनय कोरे यांना नुकतीच डिलिट पदवी मिळाल्याबद्दल ‘ सुराज्य फौंडेशन ‘ च्या वतीने त्यांना हि गौरविण्यात आले.
यावेळी माजी मंत्री डॉ.विनय कोरे,’ सुराज्य फौंडेशन ‘ चे अध्यक्ष एन.एच. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या समारंभाला परिसरातील युवकांनी, यशवंतांची मनोगत ऐकण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या समारंभाला वारणा समूहाचे सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.