बँक आणि सहकार टिकवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीलाच मतदान करा- आबासाहेब पाटील ,माजी उपाध्यक्ष
बांबवडे : आपली बँक आणि सहकार टिकवण्यासाठी अमरसिंह यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीलाच माझ्या सर्व सभासद बंधूनी मतदान करावे, असे आवाहन कोडोली अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब केशव पाटील रहाणार शिंपे तालुका शाहुवाडी यांनी सभासद बंधूंना केले आहे. तशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
निवेदनात श्री पाटील पुढे म्हणाले कि, कोडोली अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून आपणा सभासद बंधूंच्या पाठबळावर च मी संचालक म्हणून कार्यरत होतो. सध्याच्या निवडणुकीत काही तांत्रिक बाबींमुळे ,व विरोधी गटाच्या आडमुठ्या धोरणामुळे राजर्षी शाहू विकास आघाडी मधून माझ्यासह इतर आठ जणांना वेळेत माघार घेता आली नाही. त्यामुळे आपल्याच गटातील मतांची विभागणी होवून, बँकेची सत्ता अनाहूत मंडळींच्या हाती लागण्याची शक्यता आहे. यासाठी सहकार व आपली बँक टिकवण्यासाठी सर्व सभासद बंधूंनी माझ्या नावासमोरील चिन्हाचा विचार न करता अमरसिंह यशवंत पाटील ( भाऊ ) यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीच्या विमान चीन्हालाच मतदान करावे ,असे आवाहन ही आबासाहेब केशव पाटील शिंपे, यांनी केले आहे.