शाहुवाडी महिला बालकल्याण कार्यालयावर मोर्चा-जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचा बेमुदत संपाचा इशारा
मलकापूर प्रतिनिधी :
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा अन्यथा११ सप्टेबर पासुन राज्यात बेमुदत संप करणार असल्याचा इशारा, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष धोंडीबा कुंभार यांनी शाहुवाडी येथे दिला .
शाहूवाडी पंचायत समितीवर आपल्या मागण्यांसाठी शाहूवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी काढलेल्या मोर्चा सामोर बोलत होते .
शासनाने अंगणवाडी सेविका मदतनीस यांना वेळेवर मानधन दयावे. गेली अनेक महिने टी . एः, डी .ए आहार बिले मिळावी, अंगनवाडी इमारतीचे भाडे मिळावे, आदी मागण्यांसाठी शाहूवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मोर्चा शाहूवाडी गावातुन फीरून शाहूवाडी पंचायत समितीच्या महिला बालकलयाण कार्यालयाच्या दारात शासनाच्या विरोधी घोषणा दिल्या.
अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्याचे निवेदन प्रभारी महिला बालकल्याण अधिकारी, गटविकास अधिकारी डॉ उदय पाटील यांना देण्यात आले. आपल्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले जाईल, असे आश्वासन दिले .
मोर्चात शोभा पोवार, अर्चना पाटील, बिस्मिल्ला शिकलगार, आशा चावरे, छाया कुंभार, अर्चना बनसोडे, सायली जांभळे, कलावती येळवणकर, रंजना दळवी, स्वाती कांबळे, मंगल पाटील, राजश्री कुडाळकर, वैजयंती सातपूते, सुलोचना माने, आदी सह अंगणवाडी सेविका व मदतनीस संघटनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.