शैक्षणिक व्यासपीठाची आदर्शवत पावनखिंड मोहीम
मलकापूर प्रतिनिधी :
शुरवीर बाजीप्रभू देशपांडे यांना अभिवादन करण्या सोबतच पावन खिंड परिसराची विशेष स्वच्छता मोहीम राबवून शाहुवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठाने एक आदर्श वत मोहीम राबवून, पावनखिंडीला केवळ भेट न देता परिसर स्वच्छ करून एक नवा संदेश दिला आहे.
शाहुवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठाने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे .प्रतिवर्षाप्रमाणे व्यासपीठाच्या वतीनं पावन खिंड मोहीम राबविली. या मोहिमेला व्यासपीठाच्या सर्वांनी विशेष सहकार्य करून पावनखिंड परिसराला एक नवं रूप दिले .
दरम्यान या मोहिमेच्या निमित्ताने संजय जगताप यांनी मालाई धनगरवाडा शाळेस 100पुस्तकं भेट दिली, तर सतीश वाकसे यांनी आपल्या प्रबोधनातुन इतिहासाच्या आठवणी जाग्या केल्या
संस्थापक विनायक हिरवे, अध्यक्ष एम आर पाटील, संभाजी लोहार, राजेंद्र लाड, शिक्षक बँक संचालक साहेब शेख, बी. डी. पाटील, महादेव कुंभार, विजयकुमार गावडे, संजय जगताप , प्रकाश काळे, संजय गर्जे, शिवाजी पाटील, सुनीता गुरव, शोभा पाटील, वैशाली खुर्द, सतीश वाकसे, अमोल जाधव , राजू पवार, केशव मगर, मारूती गुरव, सुरेश कोळी आदीच्या सह शालेय विद्यार्थी सहभागी झाले.