उखळूच्या धबधब्यात एक बेपत्ता तर एक जखमी ; ४ जन सुखरूप
शिराळा प्रतिनिधी/ शिवाजी नांगरे :
उखळु( ता. शाहुवाडी) येथील उखळु धबधबा (म्हातारकडा ) पाहणेसाठी आलेल्या सहा पर्यटकांपैकी पाण्याच्या प्रवाहात खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर( ३५)रा. बागणी ता . वाळवा जि. सांगली हा वाहून गेला आहे. त्याचा भाऊ मेहबूब फकीर(३३) हा जखमी झाला आहे.
ही घटना मंगळवारी दुपारी १२.३०. ते १ वाजण्याच्या सुमारास घडली.या बाबत समजलेली माहिती अशी, खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर, मेहबूब बाबासाहेब फकीर, दिलीप सदाशिव नगारे, , राजेंद्र बाबूराव शेळके . प्रदिप रघुनाथ माळी , सर्व रा. बागणी ता वाळवा व अशोक माळी, (शुगर फॅक्टरी मागे सांगली )हे उखळु येथील निसर्गरम्य धबधबा पहायला गेले होते. त्यातील पाच जण पाण्याच्या प्रवाहात उतरले असता पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर हा प्रवाहाबरोबर वाहून गेला. त्याला वाचवण्याचा प्रयत्नात इतर पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले. त्यावेळी ते सर्वजण डोहातील दगड व झाडांच्या फांद्या पकडून बसले होते .यामध्ये खुदबुद्दीन चा भाऊ मेहबूब फकीर जखमी झाला आहे. ही माहिती उखळु ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उखळू येथील युवराज पाटील, भगवान अलुते , सुरेश कुलकर्णी, रमेश पाटील व त्यांच्या सहकारी मित्रानी अथक परिश्रम करून पाण्याच्या प्रवाहातून इतर पाच जणांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी तातडीने १०८ रूग्ण वाहीकेतून हलवण्यात आले. यावेळी शाहुवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल आर. गाडे, धनाजी खराटे , यांच्या बरोबर उखळू चे माजी सरपंच मारूती वडाम, शितुर चे पोलीस पाटील दिपक भोसले यांनी मदत केली.
घटनेची माहिती माहिती मिळताच शाहुवाडी पोलिस घटनास्थळी पोहोचले. सध्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस व दुर्गम परिसर असल्याने व वाहतुकीचा कोणतीही सुविधा नसल्याने वाहुन गेलेल्या युवकाचा शोध घेता आलेला नाही. मंगळवारी सकाळी शोध मोहीम सुरू करण्याची शक्यता आहे.