संततधार पावसाने चांदोली धरण पाणी पातळीत वाढ
शिराळा/प्रतिनिधी
चांदोली धरण परिसर व पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून गेल्या २४ तासात ९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा पश्चिमभागात चरण व चांदोली परिसरात अतिवृष्टी झाली आहे.
एक जूनपासून एकूण १०४१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातुन १८ हजार ५३६ क्युसेक पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा २१.६६ टीएमसी झाला असून त्याची टक्केवारी ६२.९७ आहे. पाणी पातळी ६१२.४० मिटर झाली आहे.
शिराळा तालुक्यात इतरत्र दुपार पासून पावसाचा जोर कमी आला असून गेले तीन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील कोरड्या पडलेल्या अनेक पाझर तलावात पाणी साठा होऊ लागला आहे. मंडल निहाय झालेला पाऊस असा.शिराळा (४५),शिरशी(६२), कोकरुड(२९),चरण(७४),मांगले(४२), सागाव(५२)