बेपत्ता खुदबुद्दिन चा मृतदेह सापडला
शिराळा/प्रतिनिधी:
शाहुवाडी तालुक्यातील उखळु धबधबा (म्हातारकडा ) येथे मंगळवारी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या बागणी ता.वाळवा येथील खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर याचा मृतदेह सापडला.
त्याचाशोध घेण्यासाठी बुधवारी सकाळी जीवन ज्योती रेसक्यु फोर्स कोल्हापुर येथील पथक दाखल झाले होते. त्यांच्या अथक शोधमोहीमेला पाच तासानंतर यश मिळाले. धबधब्या पासून तीन किलोमीटर अंतरावर पाण्याच्या प्रवाहात मृतदेह सापडला .
मंगळवारी उखळू येथील धबधबा पाहणेसाठी गेलेल्या सहा पर्यटकां पैकी खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर( वय वर्षे ३५ रा. बागणी ता . वाळवा जि. सांगली ) वाहून गेला होता त्यातील पाच जण पाण्याच्या प्रवाहात उतरले असता पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्याचा अंदाज न अाल्याने खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर हा प्रवाबरोबर वाहून गेला. त्याचा शोध घेण्यासाठी बुधवारी सकाळ पासुन कोल्हापूर येथील जीवन ज्योती रेस्क्यू फोर्स च्या पथकाने शोध मोहीम राबविली होती. दुपारी तीन वाजता मृतदेह धबधबा पासून तीन किलोमीटर अंतरावर ओढ्याच्या प्रवाहात आढळून आला. मृतदेह लोकांनी व रेसक्यु फोर्स च्या जवानांनी खांद्यावर घेऊन उखळु गावात आणला. शवविच्छेदन करणेसाठी मृतदेह खाजगी वाहनातून सायंकाळी पाच वाजता मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
या शोध मोहिमेत जीवन ज्योती रेस्क्यू फोर्स चे जवान सुनिल जाधव, हणमंत कुलकर्णी, सुनिल कांबळे, ओंकार कारंडे, हणमंत नदाफ, रणजीत पाटील, तेजस देसाई, ओंकार तळेकर सहभागी झाले होते. यावेळी उखळू येथील माजी सरपंच मारूती वडाम,
युवराज पाटील, भगवान अनुते , सुरेश पाटील , धनाजी खराटे व त्यांच्या सहकारी मित्रानी शोध पथकाला मदत केली.
यावेळी शाहुवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ , कोकरूड येथील सहा.पोलीस निरीक्षक भगवान शिंदे मंडल अधिकारी अंकुश रानमाळे तलाठी गजानन धनवे यांच्या सह शितुर चे पोलीस पाटील दिपक भोसले, उपस्थित होते.
.सध्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस व दुर्गम परिसर असल्याने व वाहतुकीचा कोणतीही सुविधा नसल्याने वाहुन गेलेल्या युवकाचा शोध घेताना मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान आज पणन मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी घटनास्थळी भेट दिली.