शैक्षणिक व्यासपीठाने स्वीकारले दोनशे मुलींचे पालकत्व
मलकापूर प्रतिनिधी : एकही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये आणि विशेष करून मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठाच्या पुढाकाराने व समाजातील दानशूर व्यक्तीच्या मदतीने अनाथ,गरजू व प्रज्ञावान अशा २०० मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेणेत आले. शाहूवाडी पंचायत समितीच्या सभापती डॉ. सौ स्नेहा जाधव,उपसभापती दिलीप पाटील , मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यासाठीच्या योजनेचा शुभारंभ करणेत आला.
दरम्यान या वेळी शैक्षणिक व्यास पीठाने राबवलेले उपक्रम हे प्रेरणा दायी आणि सामाजिक बांधिलकी जपली जाणारे असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले तर शैक्षणिक व्यासपीठच्या कार्यालयासाठी मलकापूर मध्ये जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व प्रकारचे मदत देण्याचे अभिवचन नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी केले.पंचायत समितीच्या माध्यमातून व्यासपीठाच्या कार्याला बळ देण्यासाठी सर्व प्रकारची मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सभापती डॉ सौ स्नेहा जाधव यांनी सांगितले.
या पालकत्व योजनेअंतर्गत १ ली ते १० वी मधील गरजू ,अनाथ मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेऊन त्यांना वह्या,दप्तर, कंपास,रंगसाहित्य, पेन,पाटी, आवश्यक संदर्भ पुस्तके आदी साहित्य देणेत येणार आहे त्याच बरोबर दिवाळी सणासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे (आनंदमय दिवाळी किट) तसेच या मुलींसाठी व्यक्तीमत्व विकास शिबीर घेतले जाणार असून या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करतील.१० वी पर्यंत शिक्षणाची जबाबदारी या योजनेअंतर्गत घेणेत येणार असून १० वी ला ९०% चे वर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनी साठी विशेष योजना राबविणेचा व्यासपीठाचा मानस असल्याची माहिती व्यासपीठाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष विनायक हिरवे यांनी दिली.
शाहूवाडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी स्थापन केलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे.तुम्ही-आम्ही पालक मासिकाच्या साद माणुसकीची अभियानांतर्गत ही योजना पूर्णत्वास नेणेत येणार आहे. कार्यक्रमासाठी नगरसेवक सुहास पाटील,केंद्रप्रमुख अंकुश बडे ,नंदकुमार कोठावळे, महेंद्र शिंदे, सुभाष कोळेकर , व्यासपीठचे संस्थापक अध्यक्ष विनायक हिरवे यांच्या सह शिक्षक वर्ग ,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रस्ताविक अध्यक्ष एम आर पाटील,सूत्रसंचालन गोविंद देसाई तर आभार बी. डी. पाटील यांनी मानले
Thank you all of you specially shri Santosh kumbhar. From-शैक्षणिक व्यासपीठ