केर्ली इथं एस.टी.बस व ट्रकची समोरासमोर धडक

आसुर्ले : कोल्हापूरहून पन्हाळ्याला निघालेल्या एसटी व गॅस सिलेंडर ट्रक यांची समोरासमोर धडक होवून अपघात घडला आहे.
आज दि.२५ जुलै रोजी दुपारी तीन वाजनेच्या सुमारास हा अपघात केर्ली ता.करवीर इथं घडला आहे. एसटी क्र.एम.एच.१४ बीटी-०७८३ हि कोल्हापूर पन्हाळा बस कोल्हापूरहून पन्हाळ्याला निघाली होती. तर ट्रक क्र.एम.एच.१० ५५५६ हा कोल्हापूरला निघाला होता. दरम्यान केर्लीजवळ हा अपघात होवून एसटी जावून झाडाला धडकली तर ट्रक हा एसटी ला समोरून धडकला.
हि टक्कर इतकी जोरात होती कि,त्या धडकेमुळे एसटी ची सर्वात मागची काच देखील फुटली आहे. या अपघातात एसटीतील अनेक प्रवाशी जखमी झाले असून सगळ्यांना कोल्हापूरला उपचारार्थ नेले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page
error: Content is protected !!