मॉर्निंग ग्रुपने वाचवला कोडोलीतील एका महिलेचा जीव..
कोडोली प्रतिनिधी : आज (बुधवारी) नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाच वाजता मॉर्निंग ग्रुपने (ग्रुपमध्ये दहा जणांचा समावेश) कोडोली ते दुर्गेवाडी वसाहत येथे पर्यंत चालत जातो.आज सकाळी कोडोली पासून नरसिंह मंदिर पुल ओलांडून हा ग्रुप चालत जात असताना मोरे शेतातील रस्तालगत एका विहिरीत एक महिला ‘मला वाचवा ओ..मला वाचवा ओ..’ असे मोठमोठ्याने ओरडताना आवाज रस्त्यावर येत होता.फिरायला जाणाऱ्या या ग्रुप ने कोणाचा तरी आवाज येतो म्हणून विहिरीच्या दिशेने धाव घेतली. बघतात तर काय, ही महिला विहिराच्या मोटारीच्या फुटबॉल नळाचा दोरखंड धरून बसली होती.त्यातच ती मला वाचवा ओ असे सांगू लागली सुरुवातीला या ग्रुपच्या लोकांना काही सुचेना. महिलेला वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करूया, अशा विचाराने ही मंडळी त्या महिलेस आधार देवून तो दोरखंड घट्ट धरा. आम्ही लगेच दुसरा दोरखंड आणतो, या विचारात पडली. लगेच शेजारील शेतामध्ये वैरणीसाठी आलेला एका शेतकऱ्यांकडून वैरणीसाठी आणलेला दोरखंड घेवून त्या महिलेस पकडण्यास सांगितले.तो दोरखंड महिलेच्या कंबरेला बांधून सर्वजण ओढत ती महिला बाहरे काढण्यास यश मिळविले.सर्वजण त्या महिलेची विचारपूस करू लागले ती म्हणाली,मी कोडोलीतील शेटे कॉलनी वसाहतीमध्ये राहते. मला साखरेच्या आजराने ग्रासले असल्याने मी सकाळी पहाटे घरात न सांगता फिरायला म्हणून बाहेर पडले विहिरीत जीव देण्याचा विचार केला.या महिलेची ओळख पटताच मॉर्निंग ग्रुपचे जयसिंग पाटील (भाऊ) यांनी तात्काळ फोन करून ही महिला कुटुंबीयाच्या स्वाधीन केली. कुटुंबीयांनी हे कळताच सर्वांचे मनापासून आभार मानून ऋण व्यक्त केले. जयसिंग पाटील(भाऊ),पांडुरंग उगळे,प्रा.एस.एस.पाटील,दीपक जाधव (पत्रकार),रामचंद्र गायकवाड(दाजी),सुधीर जाधव,दिलीप हर्षे,रंगराव भोसले,संजय भोसले.(सर्वजण रा.कोडोली ता.पन्हाळा) या मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यही सकाळी जीव वाचवण्यासाठी सहभाग घेतला.