गोगवे विद्यामंदिरास ‘शहीद सावन माने ‘ नामकरण करावे- परुळेकर
कोल्हापूर : गोगवे तालुका शाहुवाडी येथील प्राथमिक विद्यामंदिर शाळेला शहीद सावन माने यांचे नाव द्यावे,अशी मागणी माजी सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी केली आहे.
केवळ काही दिवसांपूर्वीच येथील भूमिपुत्र सावन माने यांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांच्या आठवणी भावी पिढीला प्रोत्साहानदायी असाव्या,यासाठीच ह्या प्राथमिक विद्यामंदिरास शहीद सावन माने यांचे नाव द्यावे .
सदरच्या मागणीचा जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत ठराव करण्यात आला होता. परंतु याची अंमलबजावणी स्वातंत्र्यदिनाच्या अगोदर होवून गोगवे प्राथमिक विद्यामंदिरास सावन माने यांचे नामकरण करावे, अशी अपेक्षा परुळेकर यांनी व्यक्त केली आहे.