” इस देश मी रहना होगा,तो वंदे मातरम् कहना होगा “
मुंबई :” इस देश मी रहना होगा,तो वंदे मातरम् कहना होगा ” ,विधानभवनात वंदे मातरम् म्हणण्यावरून खडाजंगी होत असताना एकनाथ खडसे यांनी हिंदीतूनच संबंधितांना खडसावले. समाजवादी पार्टीचे नेते आबू आझमी आणि एम आय एम चे वारीस पठाण यांनी ‘देशाबाहेर काढा पण वंदे मातरम म्हणणार नाही’, असे सांगितले. त्यावेळी खडसे यांनी वरील उत्तर दिले.
मद्रास कोर्टाने वंदेमातरम् म्हणण्यासाठी सक्ती केली,या मुद्द्यावरून विधानभवनात खडाजंगी झाली. यावेळी आबू आझमी यांनी वरील वादग्रस्त विधान केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान आझमी यांना उत्तर देताना आम. खडसे यांनी त्यांना सुनावले. स्वातंत्र्यपूर्व काळात या गीताच्या प्रोत्साहनाने स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात अनेक देशभक्तांनी उड्या घेतल्या,असे वंदे मातरम म्हणण्यात हरकत काय? असा प्रश्न देखील खडसे यांनी उपस्थित केला.