गोदावरी नदीला पूर : गणेशवाडी पुलाखाली बस अडकली
नाशिक : येथील गोदावरी नदीला पूर आल्याने ,गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे नाशिकच्या गणेशवाडी पुलाखाली एक खाजगी बस पुलाखाली अडकून पडली आहे. आज नाशिक जिल्ह्यात सरासरी ३७.०२ मिमी पाऊस झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाची अतिवृष्टी होत आहे. यामुळे येथील पेठ इथं १३५.३ मिमी , सुरगाणा इथं ११७.२ मि.मी., नाशिक शहरात ११मि.मि., तर इगतपुरी इथं ७६ मि.मी.,दिंडोरी इथं ७३ मिमी., त्र्यंबकेश्वर इथं ४५ मि.मी.,नांदगाव इथं २४ मि.मी.,कळवण इथं १९मि.मी., तर चांदवड इथं १८ मि.मी. पाऊस झाला आहे.