साई भक्तांसाठी रेल्वेची अपूर्व भेट : शिर्डी -दादर एक्स्प्रेस
मुंबई : साईभक्तांसाठी साई नगर शिर्डी ते दादर एक्स्प्रेस नव्याने सुरु करण्यात येणार असून ,साई भक्तांसाठी हि एक पर्वणीच केंद्रशासनाने मुंबईकरांना दिली आहे. मध्यरेल्वेच्या वतीने उद्यापासून साई नगर शिर्डी ते दादर हि विशेष साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
या गाडीचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. उद्या रविवार दिनांक ३० जुलै रोजी शिर्डी रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठीच्या विविध उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक २२१४७ /२२१४८ दादर ते साई नगर शिर्डी शुक्रवारी दादरहून रात्री २१.४५ ला सुटून शनिवारी पहाटे ३.४५ वाजता शिर्डीला पोहोचणार आहे.तर शिर्डीहून दादरसाठी हि गाडी शनिवारी सकाळी ९.२० वाजता सुटून दुपारी ३.२० ला दादरला पोहोचणार आहे.