गुन्हे विश्व

बोरपाडळे येथे नैराश्यातुन तरुणाची आत्महत्या

पैजारवाडी प्रतिनिधी:बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथील जयंसिग बाबुराव बावडेकर,वय ३५ या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली
आज सकाळी ७ च्या सुमारास बोरपाडळे लबडे वसाहत येथे शेतामधिल घराशेजारी असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेवून या तरुणाने आत्महत्या केल्याची लोकांना आढळून आले
या तरुणाची आई व दोन मोठे भाऊ व्यवसायामुळे कुटूंबासह सांगली येथे स्थायिक आहेत.तो अविवाहित असल्याने घरी एकटाच राहून शेती आणि जनावर सांभाळत होता.विवाह होत नसल्याचा नैराश्यातुन व ऐकटेपणा सहन न झाल्याने या तरुणाने आत्महत्या केल्याचे समजते आहे. या तरुणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.नातेवाईकांनी या घटनेची माहिती कोडोली पोलिसात दिली आहे

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!