सामाजिक

‘ दत्तसेवा ‘ मुंबईतील अग्रगण्य संस्था- महाराष्ट्र पत.फेडरेशनचे श्री. वसंतराव शिंदे

मुंबई : मालवणी ,मालाड इथं मुख्य कार्यालय असलेली दत्तसेवा सहकारी पतपेढी हि संस्था सामजिक, शैक्षणिक क्षेत्रात मुंबईतील एक अग्रगण्य संस्था असून, सहकारी कायद्याची अंमलबजावणी करणारी अग्रेसर संस्था आहे, असे मत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे कार्याध्यक्ष श्री. वसंतराव शिंदे यांनी व्यक्त केले.
दत्तसेवा सहकारी पतपेढी,ची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२९ जुलै रोजी कांदिवली,मुंबई इथं उत्साहात संपन्न झाली. यावेळी सभेच्या अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष श्री आनंदराव माईंगडे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री वसंतराव शिंदे बोलत होते.
यावेळी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला गेला. संस्थेचे सभासद ३५,४१४ , खेळते भाग भांडवल २४४ कोटी, ठेवी १५२ कोटी, कर्ज १३० व संमिश्र व्यवसाय २८३ कोटी असून, संस्थेच्या १८ शाखा सभासदांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. संस्थेने गेल्या २९ वर्षात सामाजिक, शैक्षणिक,क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले आहे. यामुळे विविध संस्थांनी संस्थेचा गौरव केला आहे. आर्थिक वर्षात मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, तसेच बँको या संस्थेने दत्तसेवा संस्थेचा गौरव केला आहे.
यावेळी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक श्री आनंदराव माईंगडे यांनी सभासदांच्या प्रश्नांविषयी माहिती दिली. तसेच संस्थेच्या प्रगतीकरिता अधिकारी, कर्मचारी, दैनंदिन प्रतिनिधी यांच्या मेहनतीने तसेच संचालक यांच्या सहकार्याने व सभासदांच्या विश्वासामुळे प्रगती झाल्याचे विनम्रपणे सांगितले.
यावेळी सर्वश्री सदाशिव मते उपाध्यक्ष मनसे, लक्ष्मण पाटील कार्याध्यक्ष -पश्चिम उपनगरे पतसंस्था फेडरेशन, सदानंद काशीद खजिनदार- पश्चिम उपनगरे पतसंस्था फेडरेशन, शिवाजी शिंदे, मुशर्रफ बेदाड -संचालक पश्चिम उपनगरे पतसंस्था फेडरेशन, बाळ पाटील संचालक- विशालदीप सहकरी पतसंस्था,मुंबई, अॅड. झावरे समाजसेवक, याचबरोबर सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच अहवाल सालात केलेल्या कामगिरीबद्दल संस्थेच्या जोगेश्वरी (पूर्व ), मालवणी व नायगाव शाखेस अनुक्रमे प्रथम,द्वितीय, व तृतीय चषक देवून उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यानंतर सभासदांच्या यशस्वी विद्यर्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्य व्यवस्थापक श्री. हरी पाटील यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन प्रशिक्षक श्री.संजय कुंभार यांनी केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!