सचिन मुडशिंगकर यांची बांबवडे शहरप्रमुख पदी निवड
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील शिवसैनिक सचिन महादेव मुडशिंगकर यांची बांबवडे शहरप्रमुख म्हणून निवड करण्यात आली असून, तशा आशयाचे पत्र जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी संपर्कप्रमुख श्री अरुणभाई दुधवाडकर यांच्या आदेशाने देण्यात आले आहे.
त्यांची बांबवडे शहरप्रमुख पदी निवड झालेबद्द्ल बांबवडे पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीचे पत्र देताना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी,तालुकाप्रमुख दत्ता पोवार व शिवसैनिक उपस्थित होते.