….श्रुती ने आत्मविश्वासाने यश खेचून आणले
मलकापूर प्रतिनिधी : जिद्द, आत्मविश्वास आणि परिश्रम या तिन्ही गोष्टींचा संगम झाला तर, अपेक्षित असलेले कठीण यश सुद्धा खेचून आणता येते, हे श्रुती संजय जगताप हिने आपल्या आत्मविश्वासाने सिद्ध केले आहे.
कडवे तालुका शाहुवाडी येथील आणि सांबू येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय जगताप यांची ‘ श्रुती ‘ हि कन्या आहे. हिने नीट परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. तिची ग्रँट शासकीय वैद्यकीय जे.जे. हॉस्पिटल ,मुंबई इथं नुकतीच निवड झाली आहे.
कुमारी श्रुती हिने चौथीत असतानाच, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात तिसरा क्रमांक पटकावून आपल्या बुद्धिमत्तेची पातळी सर्वांसमोर आणली होती. त्यामध्ये सातत्य ठेवून तिने दहावी मध्ये सुद्धा घवघवीत यश मिळवले, आणि इथून तिच्या करिअरचा खरा प्रवास सुरु झाला. न्यू कॉलेज कोल्हापूर इथं विज्ञान शाखेत प्रवेश घेवून, नीट परीक्षेचा अभ्यास जोमाने सुरु केला. परंतु पहिल्या प्रयत्नात श्रुतीला यश मिळाले नाही, पण निराश न होता जिद्दीने आणि आत्मविश्वासाने पुन्हा तयारी केली, आणि तिच्या परिश्रमाच्या वृक्षाला यशस्वीतेची फळे लागलीच. महाराष्ट्रातील क्रमांक १ चे व भारतातील पहिल्या पाच मधील सन १८४५ साली स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई, इथं प्रथम फेरीमध्ये तिला प्रवेश मिळाला आहे.
श्रुतीने आपल्या जिद्द,परिश्रम,आणि आत्मविश्वासाने जगताप घराण्यासह सगळ्यांसमोरच एक आदर्श उभा केला आहे.
यावेळी श्रुतीचे वडील संजय जगताप म्हणाले कि,आमच्या श्रुतीनेपरिश्रमाच्या बळावर एम.बी.बी.एस. ला प्रवेश मिळवून जगताप घराण्याचा वारसा जपला आहे.