बेपत्ता ज्ञानदेव जाधव यांचा मृतदेह सापडला
शिराळा प्रतिनिधी : अंत्री बुद्रुक (ता.शिराळा ) येथील बेपत्ता झालेले ज्ञानदेव कुंडलिक जाधव ( ९५) यांचा मृतदेह शिरशी रस्त्यावरील शिवर ओघळ येथे आज आढळून आला.
याबाबत जयंत रघुनाथ जाधव यांनी वर्दी दिली आहे. पोलिसातून समजलेली माहिती आशी, शुक्रवार( ता.४ ) रोजी ज्ञानदेव हे घरातून कोणालाही न सांगता बाहेर गेले होते . आज सोमवार सकाळी ९ च्या दरम्यान शिरशी रस्त्यावरील शिवर ओघळा मधील पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला असून पुढील तपास हवालदार बी.डी. गवारे हे करीत आहेत.