चांदोली धरणावर मगरीचे दर्शन
शिराळा प्रतिनिधी :
चांदोली धरण माथ्यावर सांडव्या कडील बाजूस पुर्ण वाढ झालेली १२ फुट लांबीची अंदाजे ४०० किलो वजनाची महाकाय मगर आढळून आली. वन्यजीव विभाग चांदोली च्या मदतीने मगरीला पकडून धरणात सोडण्यात आले.
याबाबत मिळालेली माहीती अशी की, धरण प्रशासनाचे कर्मचारी धरण भिंतीवर फिरत असताना, त्यांना पुर्ण वाढ झालेली १२ फुट लांब व अंदाजे ४०० ते ४५० किलो वजनाची मगर धरण माथ्यावर दृष्टीस पडली. त्यांनी तत्काळ चांदोली वन्यजीव विभागाच्या कर्मचार्यांना बोलावून मगरीला पकडून चांदोली धरणात सोडले. धरणावर कार्यरत असणार्या शासकीय कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यातच गेल्या दिड वर्षापासुन धरणाच्या मुख्य भिंतीवर असणार्या सर्व स्ट्रीटलाईट बंद आहेत. त्या तत्काळ सुरु कराव्यात अशी मागणी होत आहे.