कोडोलीत विकासकामांची आढावा बैठक
कोडोली प्रतिनिधी ;-
कोडोली जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील विकासकामांची आढावा बैठक समाजकल्याण सभापती विशांत महापुरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२३ऑगस्ट रोजी पार पडली.
कोडोली तालुका पन्हाळा येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या या आढावा बैठकीत ग्रामपंचायत, पशुसंवर्धन ,बालविकास, आरोग्य विभाग, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा ,कृषी व शिक्षण या विभागातील कामाचा आढावा घेण्यात आला.
पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे, पंचायत समिती सदस्या गीतादेवी पाटील, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एम.आर. पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ.ए.ए. मुल्ला , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता आर.पी.भोंगाळे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस.टी. काटकर, क्रृषी विभागाचे ए. एम. माळी, कोडोलीचे सरपंच नितीन कापरे, उपसरपंच निखील पाटील , ग्रामविकास अधिकारी शिवाजी पाटील, मतदारसंघातील ग्रामसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोडोली जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघात मंजूर झालेली कामे, प्रगतीपथावर असलेली कामे व भविष्यात करावी लागणारी कामे, याबाबतचा आढावा, या बैठकीत घेण्यात आला. सभापती विशांत महापुरे यांनी प्रगतीपथावर असलेल्या कामाबाबतची माहिती उपस्थितांना देत अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा अहवाल व इतर कामांची माहिती घेतली.