प्रकाश गोसावी यांचे अल्पश: आजाराने निधन
शाहुवाडी : ससेगाव तालुका शाहुवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बंडू गोसावी यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. मानवाधिकार संघटनेचे ते नेते होते.
प्रकाश बंडू गोसावी शाहुवाडी तालुक्यातील सामाजिक कार्याचे प्रणेते होते. शासकीय कामांच्या कागदपत्रांबाबत त्यांना संपूर्ण माहिती होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत ते प्रसिद्ध होते. प्रशासकीय कामात त्यांचा हातखंडा होता, तर गोसावी समाजाचे ते प्रतिनिधित्व करत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी ,चार मुले ,व एक मुलगी असा परिवार आहे.