मुंबई त पावसाचा धुमाकूळ : येत्या २४ तासात अतिवृष्टी हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : मुंबई त पावसाने धुमाकूळ घातला असून २६ जुलै २००५ रोजी झालेल्या पावसाची आठवण मुंबईकरांना आजच्या पावसाने झाली आहे.
आज सकाळपासून मुंबई-ठाण्याला पावसाने झोडपून काढले असून येत्या २४ तास मुसळधार पाऊस बरसणार असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. पावसामुळे मुंबईकरांचे तीन तेरा वाजले असून पोलीस व महापालिका प्रशासनाने आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केले आहे.
मुंबईतील गेल्या २४ तासातील पावसाची आकडेवारी :
१) अंधेरी 270 मिमी २) बीकेसी 204 मिमी ३) वांद्रे पश्चिम 247 मिमी ४) भांडूप 251मिमी ५) चेंबूर 214 मिमी ६) कफपरेड 123 मिमी
७) दहिसर 190 मिमी ८) घाटकोपर 221 मिमी ९) गोरेगाव 193 मिमी १०) परळ 285 मिमी ११) कुर्ला 300 मिमी .