धामवडे इथं वीज पडून गुराखी ठार
शिराळा प्रतिनिधी :
धामवडे तालुका शिराळा इथं जनावरे चारावयास गेलेल्या भानुदास मादळे ( वय ५५ वर्षे ) यांच्या अंगावर वीज पडून ,ते ठार झाले. हि घटना आज दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजनेच्या दरम्यान घडली. सदर घटनेची फिर्याद पोलीस पाटील लक्ष्मण मादळे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, भानुदास हे जनावरे चारावयास घेवून पट्ट्या चा माळ इथं गेले होते. त्याचवेळी जोरदार पाऊस व विजा होत होत्या. दरम्यान याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत भानुदास मादळे ठार झाले. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार बी.डी. गवारी करीत आहेत.